
काय लिहू नी काय नाही
काहीच कस समजत नाही
लिहायच तर ठरवल आहे
मन मात्र धावतच राही
आज एकदम ठरवलय
काही तरी लिहूनच काढू
विचारांना शब्द दिसेना
त्यांमधली भींतच पाडू
वा!! भिंत तर पडली
पण इकडचे विश्वच नवीन आहे
मनामधल्या गोष्टींना
शब्दात पकडने कठीण आहे
थोडा प्रयत्न करून पाहिला
सुरू झाले शब्दांचे खेळ
थोडा वेळ वाट पाहिली
आता लागेना विचारांचा मेळ
मी असा पोर भाबडा
कळेना मज शब्दांची भाषा
भरकटलेले विचार सारे
नाही त्याना एक दिशा
विचाराच्या एका धाग्याला
गुन्फले मी शब्द चार
आता थोडी दिशा मिळाली
घेऊ लागले विचारही आकार
गुंफताना माळ ही
झालीय माझी पूर्ण खात्री
नुसतीच नसावी सोबत तर
असावी विचारांची शब्दांशी घट्ट मैत्री
माळ ही सुंदर दिसे
गुंफता सुंदर शब्दांचे मोती
धागा मात्र पक्का असावा
मग माळ ही कुठेही शोभती
बाप्पा तुला करतो मी
नाजूकशी ही माळ अर्पण
सोबत मला देशील ना रे
शोधत आहे मी माझे मीपण
- विक्रम
2 comments:
khup sahi ahe pahilach prayatna..aawdla aaplyala..shewat jast aawdla..
धन्यवाद प्रियंका !!!
Post a Comment