Sunday, August 16, 2009

जय महाराष्ट्र


***इथे कुणाच्याच भावना दुखावण्याचा उद्देश नाही. फक्त बाहेर चाललेले पाहताना जे विचार मनात येतात ते उतरवण्याचा प्रयत्न केलाय.***
---------------------------------


आपलेच दात आपलेच ओठ
आपलेच पाय आणि आपलेच पोट
तरीही आहे तोंडावरती बोट

आमची माती आमची मानस,
जिथे उगवली ज्वारी-मक्याची कणस
तिथेच गाढतो आहोत आज आम्ही आमचीच मानस

आम्ही मराठी आमचा मराठी बाणा
आमची टाळकी आणि आमच्याच वहाणा
मोडत चाललाय कणा तरीही 'जय महाराष्ट्र' म्हणा.

- विक्रम

No comments: