
जा प्रिये तू आज आहे
मुक्त सार्या बंधनातुनी
एक झरा वाहत राहील
फक्त माझ्या अंतरातुनी
सांजवेळी सुमने सुकली
गंध ना त्यांना उरी
दिवस ज्यांनी मोहविला
मग खंत ना आता उरी
वाट जरी एक संपली
अंत हा नाही परी
चुकले ना पाउल एकही
दंड कोणता मी भरी
वन्दीले आज तुज बप्पाला
खोल खोल अंतरातुनी
राहील म्हणाला तुझ्यासवे तो
कणा-कणांतूनी, क्षणा-क्षणांतुनी.
- विक्रम
No comments:
Post a Comment