Tuesday, December 8, 2009

मन माझं..

मन माझं.. थोडसं शहाणं, खुप सारं वेडं
एका जागी ना कधी, सदा याची गडबड

याच काय हो, पण आम्हाला असतात कामं ऑफीसात,
हे जातं आपलं भिजायला.. आठवणींच्या पावसात
नको जात जाउ सांगतो.. हजारदा तरी दिवसात
ऐकतय कधी?.. येताना ओले.. मग डोळेही असतात

दिसू लागते मग.. जुन्याच जखमांवरची.. नवी ओरखड...
मन माझं.. थोडसच शहाणं, खुप सारं वेडं

तासनतास पाहत असतं.. ’ति’चीच वाट,
याला वाटत.. होइल पुन्हा कधीतरी तिची भेटगाठ
का नाही आठवत याला, तिने फिरवलीय केव्हाच पाठ
या सगळ्यामधे मात्र, याचीच लागतेय पुरती वाट

कधी कळणार ना ’ति’ला, याची ही सगळी धडपड
मन माझं.. थोडसच शहाणं, खुप सारं वेडं

कधी कधी याला काय होतं.. कळत नाही खरं
स्वत:भोवती रिंगण करुन.. त्या शून्यात हरवतं
विचारलं त्याला, वाटत नाही का बाबा तुला बरं
तेव्हा झालेलं असतं ते.. आंधळं-पांगळं.. मुकं नि बहिरं

मग वाटतं, नको रे देवा ही शांतता.. बरी त्याची बडबड
मन माझं.. थोडसच शहाणं, खुप सारं वेडं

----
विक्रम
(०८-१२-२००९)

No comments: