Friday, September 4, 2009

जिद्द


दादरच्या स्टेशनवर पॉलिश करतो मी तासनतास
तेव्हा जाउन कुठे होते कमाई माझी पाच-पचास

हाती उरते कमी, बाकी पिणार्‍या बापास
रात्रशाळेत शिकतो, पुरी कराया आईची आस

बघवत नाही माईकडे, गुदमरुन जातो माझा श्वास
अजुन किती दिवस, सोसणार आहे ती हा त्रास

कधी वाटत बस्स, पुरे झाला हा वनवास
मलाही मोठ्ठ व्हायचय, ध्यानीमनी एकच ध्यास

करुनी खुप-खुप अभ्यास, होणार हो मी पण खास
जीवनाच्या या परिक्षेत, होणार हो मी पण पास

ऐकल आहे, बप्पा मदत करितो त्यांस
कष्ट जे करित राहती, धरुनी भक्तिची कास

इथे काय बसलोय मारत गप्पा, निघतो वदूंन बप्पास
अनंत आहेत माझी ध्येये, किनारा आहे त्या पामरास


- विक्रम

1 comment:

Priyanka Joshi said...

kharach khup chaan ahe hi kavita..apratim..asach lihit raha..