Friday, September 4, 2009

जिद्द


दादरच्या स्टेशनवर पॉलिश करतो मी तासनतास
तेव्हा जाउन कुठे होते कमाई माझी पाच-पचास

हाती उरते कमी, बाकी पिणार्‍या बापास
रात्रशाळेत शिकतो, पुरी कराया आईची आस

बघवत नाही माईकडे, गुदमरुन जातो माझा श्वास
अजुन किती दिवस, सोसणार आहे ती हा त्रास

कधी वाटत बस्स, पुरे झाला हा वनवास
मलाही मोठ्ठ व्हायचय, ध्यानीमनी एकच ध्यास

करुनी खुप-खुप अभ्यास, होणार हो मी पण खास
जीवनाच्या या परिक्षेत, होणार हो मी पण पास

ऐकल आहे, बप्पा मदत करितो त्यांस
कष्ट जे करित राहती, धरुनी भक्तिची कास

इथे काय बसलोय मारत गप्पा, निघतो वदूंन बप्पास
अनंत आहेत माझी ध्येये, किनारा आहे त्या पामरास


- विक्रम

Thursday, September 3, 2009

आठवण


खर सांग ना प्रिये, होते का तुला माझी आठवण ?
आठवत का नाही तुला, सोबतचे ते चार क्षण ?

हातामधे हात घेउनी, फिरलो होतो दोघे आपण
विश्व होते दोघांचेच, अन... रमत नव्हते कुठेच मन

सुख-दु:खाच्या गोष्टी केल्या, काय होते त्यास कारण
तुझ्या एका इच्छेसाठी, ठेवला असता जिवही मी तारण

काय झाल कुणास ठाउक, आल कुठून हे वळण
पडल होत सुदंर चांदण, कस लागल त्यास ग्रहण

जाता जाता मागीतलस, का ग अस वचन
Keep Smiling म्हणालिस, केलीस ना माझी अडचण

विचारु नकोस कसा आहे मी, सुनं आहे सार जीवन
जगतो आहे मी मरण, हरएक दिवस हरएक क्षण

खोट का होइना प्रिये, एकदा तरी म्हण
आठवण त्या चार क्षणांची, जपली आहेस सोबत तुपण !!!

- विक्रम