Friday, June 14, 2013

आत्मा

आत्मा

इंद्रियं हे शरीर-रथाचे घोडे आहेत. कारण त्यांच्यावाचून तो क्षणभरसुद्धा चालू शकणार नाही. रथाला नुसते घोडे जुंपले, तर ते सैरावैरा उधळून, रथ केव्हा, कुठल्या दरीत जाऊन पडेल आणि त्याचा चक्काचूर होईल, याचा नेम नाही; म्हणून इंद्रियरूपी घोड्यांना मनाच्या लगामाचं बंधन सतत हवं; पण हा लगामदेखील सदैव सारथ्याच्या हातांत असायला हवा! नाही तर तो असून नसून सारखाच! म्हणून मनावर बुद्धीचं नियंत्रण हवं. बुद्धी आणि मन ही दोन्ही मिळून संयमानं हा रथ चालवू शकतात.

अशा रीतीनं रथ नीट चालेल; पण त्यात रथीच नसेल, तर शेवटी रथ जाणार कुठं? त्याचं कार्य काय? सर्व मानवांत वास करणारा आणि आपल्यापैकी प्रत्येकात ’मी’च्या रूपानं जागृत झालेला जो ईश्वरी अंश असतो - जो मन आणि बुद्धी यांच्या पलीकडं राहतो - इतकंच नव्हे, तर जन्म आणि मृत्यु यांच्या पलीकडे पाहू शकतो- तो आत्माच या शरीररूपी रथातला रथी होय.

- ’ययाति’ - वि. स. खांडेकर.

Thursday, June 13, 2013

एका ’फूल’झाडाची कहाणी

एका ’फूल’झाडाची कहाणी

एका माळरानावर एक फुलझाड होतं. अगदी साधंच होतं ते. फुलांना विशेष असा काही रंग किंवा गंध नव्हता. पण त्या माळरानावर ते एकच फुलझाड असल्याने तिथल्या परिसरातल्या मधमाश्या, फुलपाखरे यायची आणि मध पिउन जायची. कोणि एकदुस‌‌‌र्‍याशी काही बोलत नसायचं. सगळं कसं यांत्रिकपणे चालू होतं. त्या झाडाला ती पाखरे येतात म्हणुन काही सुख नव्हतं ना अश्या माळरानात राहण्याचं दु:ख. जगणं म्हणजे वेगळं काही असतं का? असा प्रश्न पण त्या झाडाला पडला का कधी काय माहित !
एके दिवशी जोराचा वारा सुटला होता. एक मस्त रंगी-बेरंगी फुलपाखरु रस्ता चुकलं आणि जोराच्या वार्‍याने उडत त्या माळरानावर पोहोचलं. वार्‍यापासून बचाव म्हणुन त्याने त्या फुलझाडाच्या फांदीचा आधार घेतला. त्या झाडाने पण प्रयत्न केला त्या फुलपाखराला आडोसा देण्याचा. वारा थांबला तेव्हा फुलपाखराने त्या झाडाचे आभार मानले आणि ते तिथुन निघाले.
दुसर्‍या दिवशी ते फुलपाखरु पुन्हा त्या झाडापाशी आले. त्या झाडाने ओळखले त्या फुलपाखराला, पण सवयीप्रमाणे ते स्वत:हून काही बोलले नाही. मग फुलपाखराने विचारले, ’कित्ती उजाड माळरान आहे ना हे?’. झाडाने फ़क्त मान डोलावली. ’तुम्हाला कंटाळा नाही का येत इथला?’. आता त्या पाखराला कोण सांगणार की ते झाड स्वत:हून ती जागा सोडुन कुठे जाणार, पण पाखराची बडबड आपली चालुच होती. ’आमच्या तिकडे कि नाही खुप मस्त झाडे आहेत, रंगी-बेरंगी फुलं, बरेच पक्षि, फुलपाखरे. खुप खुप मजा असते तिकडे! ’.
बराच वेळ चाललेल्या बडबडीला कंटाळून त्या फुलझाडाने फुलपाखराला विचारले, ’हे सगळं तु मला का सांगतोस? आणि इतकं सगळं तिकडे छान असताना तु इकडे काय करत आहेस.’
’मी कालच्या वार्‍यामुळे इकडे उडत आलो, आणि आता रस्ता चुकलो आहे. कालपासुन रस्ता शोधतोय पण काहीच सापडत नाहीए’, फुलपाखरु उत्तरले.
फुलपाखराचा रडवेला चेहरा पाहून त्या झाडाला त्याचे वाईट वाटले. ते त्या पाखराची समजूत काढण्यासाठी म्हणाले, ’काही काळाजी नको करु. माझ्याकडे एक पक्षी राहतो, तो भटकत असतो दिवसभर इकडे-तिकडे. त्याला माहीत असेल तुझं गाव. त्याला आपण सांगु, तो शोधेन रस्ता आणि सांगेल. तोपर्यंत तु इथे रहा.’  .
असं सांगत त्या झाडाने त्याच्या एका फांदीवरचे एक ताजेतवाने फुल पुढे केले. ते पाहून ते फुलपाखरु खुष झाले आणि आनंदाने बागडु लागले. खरं पाहता त्या पाखराला याहूनही खुप सुंदर, सुगंधी, रंगी-बेरंगी फुलांची सवय, पण का काय माहीत आजइतके खुष ते कदचित कधीच नव्हते. फुलझाडाला तर हे सगळे नविनच. नेहमी येणारी पाखरे फक्त मध प्यायची आणि निघुन जायची.
या फुलपाखराने त्या फुलातला मध चाखला. फुलपाखरू त्या मधाच्या चवीमधे हरवून गेले. मध पिउन संपला तरी ते भानावर काही आले नाही. मग झाडाने फांदी हलवुन उठवले आणि विचारले, ’काय झाले? कुठे हरवलास?’.
’तु या अशा माळरानावरचं झाड, आणि तुझ्या फुलांमधे असा सुमधुर रस.. कसं शक्य आहे? मी जिथुन आलोय तिथे इतकी फुलझाडे आहेत, विविध रंगांची उधळण करणारी फुले आहेत तिथे. पण आजपर्यंत मी असा मध चाखला नाही. काय गुपित आहे तुझ्याकडे?’, फुलपाखरू एकदम हरवून गेले होते त्या मधाच्या स्वादामधे.
या झाडाला काहीच कळत नव्हते. असं काही आपल्याकडे असामान्य आहे हे कोणि कधी बोललं नव्हतं आजपर्यंत त्याच्याशी..
’सांग ना.. खरंच काहीतरी विशेष आहे तुझ्याकडे’. फुलपाखराचं चालुच होतं.
’मला नाही रे माहीत की माझ्या फुलांमधे असे काही माधुर्य़ आहे आणि आजपर्यंत मला कोणि हे सांगितलं पण नाही. असो, तुला आवडले ना.’.
’बाकीच्यांना खरचं कळतं नसेल तु काय चिज आहेस ते. पण तुला पण माहित नाही हे आश्चर्य!’, फुलपाखरु म्हणाले.
ते फुलझाड हे ऐकुन थोडे ओशाळलेच. थोडेसे स्मित करुन अजुन एक फुल त्या फुलपाखरासमोर केले. पुन्हा ते पाखरु मधाच्या चवीमधे हरवून गेले.

झाडाने त्याच्याकडे राहणार्‍या पक्षाला त्या फुलपाखराचे गाव शोधायला सांगितले.
पुढचे काही दिवस ते फुलपाखरु त्या माळरानावरच राहू लागले. दिवसातला बराचसा वेळ ते त्या झाडासोबत असायचे. त्या फुलपाखराला खुप गप्पा मारायला आवडायच्या.झाडाला जरी हे नविन असले तरी सगळे आता आवडु लागले आणि हळुहळु ते झाड पण गप्पा मारायला शिकले.
झाडाने माळरानावरचे किस्से पाखराला सांगितले. बर्‍याचदा पाणि नसताना कसे प्रसंग यायचे तिथल्या जनजिवनावर. तरीपण हे झाड कसे तग धरून आहे.
इतकी फुलपाखरे , पक्षि त्या झाडावर यायचे , राहायचे. पण या फुलपाखराशी काही वेगळेच नाते जुळले होते. फुलपाखराकडे त्यामानाने खुप जास्त अनुभव होते. ते सगळे ऐकताना त्या झाडाला वाटायचे की आपण पण अश्या ठिकाणी जन्माला यायला हवे होते. मग हे पाखरु आपल्याला खुप पुर्वीच भेटले असते. जीवन किती सुखी असते. आता याच्या गावाचा शोध लागला की ते पुन्हा परत जाणार त्याच्या गावी, आणि पुन्हा आपण एकटे.
खुपच विचित्र असे सगळे विचार त्या झाडाच्या डोक्यात फ़िरु लागले.
फुलझाडावर राहणारा पक्षि एके दिवशी फुलपाखराच्या गावाचा शोध लावुन आला आणि त्याने ते पाखराला सांगितले. फुलपाखरु पण या झाडासोबत इतके रमले होते इथे माळरानावर त्याने परत गावाला जायचा निर्णय पुढे ढकलला.
मस्त गट्टी जमली होती दोघांची.
फुलझाड पण आता पुर्वीपेक्षा जास्त फुललेले असायचे. फुलेही थोडीफार रंगीबेरंगी दिसु लागली होती. पण आता इतर पाखरांना तिथे काही मिळत नसायचे. असेही इतर पाखरे फक्त मधासाठीच येत असायची त्यामुळे झाडाला त्याचे काही दु:ख नव्हते. त्यांच्याशी काही बोलने नसायचेच.
पुढचे काही दिवस मजेत चालले होते. मधे एकदा ते फुलपाखरु सकाळपासुन त्या झाडाकडे फिरकलेच नाही. झाडाला काळजी वाटु लागली. दुसर्‍या दिवशी ते परतले तेव्हा झाडाने विचारले तर फुलपाखरु म्हणाले, ’काही नाही. असंच माझ्या गावी गेलो होतो. काय झालं?’.
’काही नाही. तु आला नाही काल पासुन तर मला काळजी वाटत होती म्हणुन विचारलं. बरं ठिक आहे, हे बघ नवीन कळी उमलतीय तिथे वर. यावेळी थोडी वेगळी छटा देण्याचा प्रयत्न केलाय, कसा आहे?’, झाड म्हणाले.
पाखराने ते पाहिले आणि ’छान !’ असे उत्तर दिले, पण ते नेहमी सारखे वाटले नाही. कोरडेपणा जाणवला त्यात.
पुढे काही दिवस अधुन-मधुन फुलपाखरु असे गायब होऊ लागले. झाडाला काही समजत नव्हते की काय झालंय. एके दिवशी झाडाने विचारले तेव्हा फुलपाखरु भडकले आणि म्हणाले,’ मी एक फुलपाखरु आहे, इकडे-तिकडे बागडणे हा माझा स्वभाव आहे. मला कोणि बांधुन ठेवू शकत नाही’.
हे ऐकून फुलझाड बिचारे निरूत्तर झाले.
दुसर्‍या दिवशी त्या झाडाने फुलपाखराची माफ़ी मागितली आणि म्हणाले, ’ मी तुला इथे बांधुन नाही ठेवत आहे. फक्त तु नसला कि मला करमत नाही म्हणुन विचारले. खरंच मला माफ़ कर.’
आता फुलपाखराच्या गप्पा पहिल्यासारख्या होत नव्हत्या. झाडाचा मुळत:च स्वभाव शांत आणि दिवसभरात त्या माळरानावर असे काही विशेष न घडल्याने बोलण्यासाठी काही विषय नसायचा.
फुलपाखराचे इतर ठिकाणी बागडणे चालुच होते. पण आता या फुलझाडाशी पहिल्यासारखे जवळीक दाखवत नव्हते.
एके दिवशी पुन्हा ते असेच गायब झाले, ते पुन्हा न परतण्यासाठीच. झाडाने खुप वाट पाहिली. पण महिना झाला तरी ते फुलपाखरु काही परतले नाहीच.
त्या झाडावर राहणार्‍या पक्षाने एके दिवशी त्या झाडाला सांगितले कि त्या माळरानापासुन काही अंतरावर एक खुप मोठी नविन बाग तयार केली आहे. तिथे भरपूर झाडे लावली आहेत. तर त्या पक्षाने त्या फुलपाखराला आधीही तिथे पाहीले होते आणि आताही ते फुलपाखरु तिथेच स्थायिक झाले आहे. ते तिथे मजेत राहत आहे आणि तु त्याची वाट पाहणे सोडुन दे.
हे ऐकून त्या झाडाला जो धक्का बसला, त्यातुन त्याला सावरता येईना. त्याच्या फुलांचा रंग फिका होउ लागला, पुढे तर नविन कळ्या-फुले उमलणे पण कमी झाले.
नविन पाखरे येणे तर आधी कमी झालेलेच होते, आता ते बंदच झाले. ते झाड आता त्या माळरानावर फक्त नावाला उभे होते. आधीही असाच यांत्रिकणा होता जीवनामधे. पण त्या आणि आजच्या परिस्थितीमधे एका ’आयुष्यभराचे’ अंतर होते. फुलपाखरुच होते ते शेवटी, हे त्या झाडाला समजायला मात्र उशिर झाला होता...
ते स्वत:शीच पुटपुटले...

"साथ सोडली मधेच तू अशी
कशी भरणार तुझी उणिव,
एकटा होतो तुला भेटण्याआधी
आज झाली एकटेपणाची जाणिव."

--


Saturday, May 18, 2013

महाराज ( द बोक्या)


एक मांजर येत असायची आमच्या घरी.. संध्याकाळी चहाची वेळ झाली की.. एके दिवशी तिने आमच्या घराच्या मागे छोटीशी बाग आहे तिथे २ पिल्लांना जन्म दिला. तिघांसाठी ती एकदम सुरक्षित अशी जागा होती. दोन्ही पिले तिथेच मोठी झाली. त्यांचे खेळ बघायला मजा यायची. नंतर ती मांजर आणि एक पिल्लू बाहेर पडले ते पुन्हा कधी दिसले नाहीत. पण एका छोट्या बोक्याला मात्र आमचे घर आवडले. त्याने तिथेच आपले बस्तान मांडले.
बोक्याच्या जातीला शोभणार नाही असा काहीसा (सुदैवाने) स्वभाव त्याचा होता - जसं की स्वत:हून त्याने कधी दुधाच्या भांड्याला तोंड लावलं नाही (अपवाद - एके दिवशी तुप कढवून थंड करायला ठेवले असताना दोन्ही लहान पिलांनी मस्त डल्ला मारला होता),- बोके सहसा माणसांजवळ येत नाहीत, ते त्याना आवडत नाहीत,मस्त खावं-प्यावं आणि कुठे उंचीवर चढून ताणून द्यावी, पण आमच्या बोक्याला मात्र एकदम आमच्या सहवासाची सवय झालेली. हॉलमधे बैठकीवर मस्त पसरण्याची त्याची सवय. त्याच्या अशा काही ’रॉयल’ सवयी पाहून माझ्या वडीलांनी त्याला ’महाराज’ असे नाव ठेवले होते.


एका राजेशाही थाटात



त्याला खेळायला एक प्लास्टीकचा बॉल होता, त्याच्या समोर टाकायचा आणि त्याचा तो घरभर खेळत राहायचा. मजा असायची त्याला असं खेळताना पाहायला..
एकदम कुटुंबातीलच एक असा त्याचा घरामधे वावर होता. त्याच्या भुकेच्या वेळी किचन मधे जाउन मोठमोठ्याने आवाज द्यायचा, पण स्वत:हून कधी ओट्यावर चढुन दुधाला किंवा कुठल्या खाण्याला तोंड लावत नसे. आई त्याला सारखं रागावत असायची, पण जर कधी त्याच्या दुधाच्या वेळेवर घरी नाही आला कि सारखं त्याचं नाव काढायची. कधीकधी तो बाहेरचंच काही खावून यायचा आणि शांत पडून राहायचा, मग लक्षात यायचं की आज उंदीर किंवा पारव्याची शिकार झालेली असणार. एकदा असाच पारवा पकडला आणि सरळ घरात घेउन आला. मग त्याला बाहेर हाकलून द्यावं लागलं, पुन्हा मात्र असलं जे काही असेल ते बाहेरच खाऊन यायचं हे त्याच्या लक्षात आलेलं असावं. त्याने आमच्या घराबाजूला २-३ वेळा छोट्या-मोठ्या सापांना पण मारलं होतं.
आधी घराचं दार बंद असल्यावर बाहेरून आवाज द्यायचा, नंतर मोठा झाल्यावर दाराची कडी पण वाजवायला शिकला होता तो.








माझ्या भावाला मुलगा झाला, तेव्हा बोक्या १.५ - २ वर्षाचा असेल. ब‍र्‍याच लोकांनी आम्हाला सांगितलं की लहान मुल आहे तर बोक्याला आता घरामधे येऊ देउ नका . पण आमच्या घरामधे कोणीच ते मान्य केलं नाही. पण त्याला हे जाणवलं की घरामधे कोणितरी नविन पाहुणा आलेला आहे आणि सगळ्यांच लक्ष त्या नविन पाहुण्याकडेच आहे. दुरुनच पाहायचा तो हे सगळं. पुढे आम्ही बाळाला हॉलमधे बैठकीवर ठेवू लागलो. तेव्हांही तो त्याच्याकडे दुरुन पाहत असायचा. पुढे २-२ , ३-३ दिवस तो घरी यायचाच नाही. त्याला कुठेतरी हे कळुन चुकलं होतं की आपली जागा या नवीन पाहुण्याने घेतली आहे. नंतर असाच एके दिवशी जो तो गेला , पुन्हा कधी परतलाच नाही.. खुप शोधाशोध केली आम्ही, शेजारीपण विचारुन बघितलं, कोणिच त्याला पाहीलं नव्हतं.. कदाचित आम्हाला तेव्हा त्याच्या मनातलं समजायला उशिर झाला होता..



डोळ्यातले निरागस भाव









Monday, February 28, 2011

"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी"

आज मराठी भाषा दिवस. तसे वर्षभरात आपण बरेच दिवस साजरे करत असतो. होळी, दिवाळी, ख्रिसमस, ईद सारखे सण. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, तसेच आजकालच्या तरुणाईचे आवडते वॅलेंटाइन डे, रोझ डे, फ़्रेंडशिप डे, मदर्स डे, फादर्स डे आणि असेच अनेक. हे सगळे दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. वैयक्तिकरित्या एकमेकांना शुभेच्छा, भेटवस्तु देऊन, किंवा सार्वजनिक पातळीवर उत्सव साजरा करुन.

पण माझी थोडी संभ्रमवस्था झाली आहे, की मुळत: मराठी भाषा दिवस साजरा करण्यामागे हेतु काय आहे? साजरा करायचा म्हणजे नक्की काय करायचं? व्याख्यानं, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा वगैरे आयोजित करुन सार्वजनिक पातळीवर साजरा केला जाउ शकतो, माझी खात्री आहे काही सामाजिक संस्था किंवा राजकारणी मंडळी अशा पद्ध्तीने साजरा करतही असतील. पण आपण वैयक्तिक पातळीवर कसे योगदान करु शकतो?

मुळातच हा दिवस साजरा करण्याचा हेतू आधी स्पष्ट व्हायला हवा. मराठी आपली मातृभाषा आहे, पण खरचं तिची जपणुक आपण करतो आहोत का? नविन पिढी तर पुर्णपणे इंग्रजाळत चालली आहे. मान्य की इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा, पुढे जायचं असेल तर इंग्रजी यायलाच हवी. पण म्हणुन या अट्टहासापायी आपण आपल्या मायमराठी पासुन दुर जाण्याची गरज काय?
कवी सुरेश भटांनी म्हटल्याप्रमाणे "आपुल्या घरात हाल सोसते मराठी.." अशी वेळ आली आहे मराठी भाषेवर.

माझ्या मते कोणतिही भाषा ही तिच्या साहित्याने ओळखली जाते. आपल्या मराठी भाषेला तर साहित्याचा वैभवशाली इतिहास आहे. संत ज्ञानेश्वर, रामदास स्वामींपासुन ते वि.स.खाडेकर, वि.वा.शिरवाडकर, पु.ल., प्र.के., व.पु... आज मराठी दिवस साजरा करताना मला असं वाटतय की या निमित्ताने आपल्यापैकी प्रत्येकाने जर एक मराठी पुस्तक खरेदी करायचं ठरवलं (वाचण्यासाठी,.. दिखाव्यासाठी नाही!!) ते पण मोलाचं योगदान ठरेल. कोणि आपल्या प्रियजनांना भेट म्हणुन पण पुस्तकं देउ शकतो. घरापसुन जवळ जर एखादं ग्रंथालय असेल तर तिथलं सदस्यत्व घ्यायचं ठरवा. मुलांमधे लहानपणापासुनच वाचनाची गोडी लागेल या द्रुष्टीने प्रयत्न करावा.

खरच मराठी भाषा जपायची असेल आणि वाढवायची असेल तर त्यासाठी आजच प्रयत्न करायला हवेत, आजच्या तरूण पिढीला याची जाणिव करुन देणं खुप गरजेचं आहे. चला, आपण सगळे मिळुन आपला खारीचा वाटा उचलुयात!!! काय मग, होणार ना सहभागी?

"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी"
(कवी सुरेश भट)

"जय महाराष्ट्र"

---
विक्रम काटे.
२७ फेब्रुवारी २०११

Monday, May 17, 2010

तुझे आहे तुजपाशी..

While reading one of my friends' blog - Have you seen your golden house yet?, it reminded me of a small piece of story from one of the 'VaPu' (popular Marathi author V P Kale) books and thought of sharing it with you all.
-

A man was walking in the jungle, carrying a lot of iron chains on his shoulders. Every next step, he used to pick up a stone and polish it on chains and then throw it away. He kept on doing this for long time. A passerby asked him, "What are you doing man? What is it that you are searching for?"

He answered, "I heard about the Philosopher's stone which transforms iron into gold. I am searching for it. If I am able to find it, I will convert all these iron chains into gold and I will be happy forever in my life."

Few years later, same man met this passerby again. He was still carrying the chains, but this time all these chains were of Gold. He was not able to walk as fast as earlier due to his age and the weight of those chains. Still he had a piece of iron in his hand and he was still picking up the stones & polishing it on iron.

Passerby asked this man, "Now all your chains are golden, still you are hungry, that too for this small piece of iron. Hadn't you found that Philosopher's stone?"

Man answered, "As you can see that all of my iron chains are now golden, means I have had found the Philosopher’s stone. But this job of picking up the stone and throwing it after polishing on the iron chains, I was doing it so mechanically, that I could not recognize which stone worked out and made these iron chains golden. In that process, somehow I lost that Philosopher's stone. Now I am again searching for the same stone."
-

What is it that this man in the story was looking for? He wanted to be happy by converting all of the iron chains into gold. He actually found the Philosopher's stone also and all his chains were converted to gold. But in the process, he forgot what his need was. Instead of looking at all golden chains that he is having and enjoying what he has, he is now looking for that Philosopher's stone again.

Same thing happens with us all. In this world of rat race we forget what we already have and instead of enjoying it, we tend to run behind the new things always. It’s true what Sant Tukaram said many years ago –

तुझे आहे तुजपाशी,
परि तू जागा चुकलाशी..
(what's yours is within you)

---
17-may-2010

Thursday, May 6, 2010

नको शिवराया, जन्म आता घेउ..

नको शिवराया, जन्म आता घेउ
महाराष्ट्र जो होता, तैसा नाही

हवा आहे तु सर्वा, शेजा‍‍र्‍या घरी
होई कोण जननी, जिजाबाई

आळवती नाव तुझे, जनता सारी
एक तुझी जयंती अन, महाराष्ट्र दिनी

अवतरशील तुपण, लढावया शत्रुशी
मावळा न दिसे, तुझिया पाठी

म्हणवती मावळे, शुरवीर स्वत:ला
अपुल्याच लोकांवर, चाले तलवारी

पाहोनि हे सारे, होशिल उदास,
काय होते काय झाले, स्वराज्यात

--
०६-मे-२०१०

Friday, April 16, 2010

मुखवटा


गर्दीमधुनी चालतो एकटा
चढविला आहे एक मुखवटा
सुख काय, दु:ख काय..
चेहर्‍यावरती एकच छटा.
---
१६-एप्रिल-२०१०